समाज कल्याण विभाग

शिष्यवृत्ती

                                     योजनेचे नांव – सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती

 

उद्देश :-

        इ. 5 वी ते 10 वीत शिकणा-या मागासवर्गीय मुलींमधील शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्याच्या दृष्टीकोनातुन प्रोत्साहन पर अनुदान म्हणुन हि सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती दिली जाते. सदरील शिष्यवृत्ती हि 1996 पासुन अनु.जाती व विमुक्त जाती व भटक्या जमाती विमाप्र करिता तसेच 2019-20 पासुन इतरमागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांनींकरिता नव्याने लागु करण्यात आलेली आहे.

 

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

 इ. 5 वी ते 7 वीत शिकणा-या प्रति विद्यार्थीनीस दरमाह रु. 60/- प्रमाणे 10 महिन्या करिता रु. 600/- व इ. 8 वी ते 10 वीत शिकणा-या प्रति विद्यार्थीनीस दरमाह रु. 100/- प्रमाणे 10 महिन्या करिता रु. 1000/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित लाभार्थ्यांस अदा केली जाते.

 

योजनेच्या प्रमुख अटी

  1. विद्यार्थीनी विजाभज/विमाप्र, अनु.जाती, इमाव या प्रवर्गातील असावी.
  2. विद्यार्थीनी इ. 5 वी ते 7 वी व 8 वी ते 10 वीमध्ये शिकणारी असावी.
  3. विद्यार्थीनी हि शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.

 

अर्ज करण्याची पद्धत

            संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील पात्र विद्यार्थींनींचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे.

 

 

योजनेचे नांव – माध्यमिक शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती

 

उद्देश :-

        शासन निर्णय दिनांक 17 ऑगष्ट 1995 अन्वये  हि योजना अनु.जाती, अनु.जमाती. विजाभज विमाप्र प्रवर्गाच्या माध्यमिक शाळेतील हुशार व गुणवान विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता हि योजना सुरु करण्यात आली आहे.

 

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

  1. इ. 5 वी ते 7 वीत शिकणा-या अनु.जाती व अनु.जमाती च्या विद्यार्थ्यांस दरमाह रु. 50/- प्रमाणे 10 महिन्या करिता रु. 500/- व इ. 8 वी ते 10 वीत शिकणा-या प्रति विद्यार्थीनीस दरमाह रु. 100/- प्रमाणे 10 महिन्या करिता रु. 1000/-
  2. इ. 5 वी ते 7 वीत शिकणा-या विजाभज/ विमाप्र च्या विद्यार्थ्यांस दरमाह रु. 20/- प्रमाणे 10 महिन्या करिता रु. 200/- व इ. 8 वी ते 10 वीत शिकणा-या प्रति विद्यार्थीनीस दरमाह रु. 40/- प्रमाणे 10 महिन्या करिता रु. 400/- शिष्यवृत्तीची रक्कम संबंधित लाभार्थ्यांस अदा केली जाते.

 

योजनेच्या प्रमुख अटी

  1. विद्यार्थी हा विजाभज/विमाप्र, अनु.जाती, अनु. जमाती या प्रवर्गातील असावी.
  2. विद्यार्थी हा इ. 5 वी ते 10 वीमध्ये शिकणारी असावी.
  3. गतवर्षी वार्षिक परिक्षेत विद्यार्थ्यांना 50 % पेक्षा जास्त गुण घेउुन विद्यार्थी वर्गात्‍ प्रथम व द्वितीय क्रमाने पास झालेला असावा.
  4. विद्यार्थीनी हि शासन मान्य शाळेत नियमित शिकणारी असावी.

 

अर्ज करण्याची पद्धत

            संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे.

 

 

योजनेचे नांव – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन

 

उद्देश :-

        सदर योजनेंतर्गत अनु.जाती, विजाभज विमाप्र, प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाकडे कल वाढण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रशिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण देवुन त्यांना विविध क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करुन देणे.

 

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

            यात तांत्रिक शिक्षण विभागाकडुन प्रतिमहा रु.40/- व या विभागामार्फत प्रतिमहा रु.60/- याप्रमाणे विद्यावेतन दिले जाते. ज्या विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मंडळांकडुन विद्यावेतन दिले जात नाही. त्या पात्र विद्यार्थ्यांना प्रतिमहा रु.100/- याप्रमाणे या विभागांकडुन विद्यावेतन दिले जाते.

 

योजनेच्या प्रमुख अटी

  1. विद्यार्थी हा विजाभज/विमाप्र, अनु.जाती, या प्रवर्गातील असावी.
  2. विद्यार्थ्यांने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
  3. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.65290/- पर्यंत असावे.
  4. प्रशिक्षणार्थ्यांची निवड संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य करतात.

 

अर्ज करण्याची पद्धत

            संबंधित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेने पात्र पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे.

 

 

योजनेचे नांव अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅटिकपुर्व शिष्यवृत्ती

 

उद्देश :-

        अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिक्षण संधी उपलब्ध करुन देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणने कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागु करण्यात आली आहे. हि शिष्यवृत्ती सर्व जाती धर्माला लागु आहे.

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

  1. वसतिगृहात न राहणारे विद्यार्थ्यांना दरमहा रु.225 प्रमाणे 10 महिन्यांकरिता रु. 2250/- व तदर्थ अनुदान रु.750/- असे एकुण रु.3000/-
  2. वसतिगृहात राहणारे विद्यार्थ्यांना दरमहा रु.700 प्रमाणे 10 महिन्यांकरिता रु. 7000/- व तदर्थ अनुदान रु.1000/- असे एकुण रु.8000/- शिष्यवृत्ती दिल्या जाते.

योजनेच्या प्रमुख अटि

  1. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार, कातडी सोलने, कातडी कमावणे, कचरा गोळा करणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना आणि कागद, काच, पत्रा वेचकांच्या पाल्यांना हि शिष्यवृत्ती दिली जाते.
  2. हि शिष्यवृत्ती सर्व जाती धर्माला लागु आहे.
  3. उत्पन्नाची अट नाही.
  4. अस्वच्छ व्यवसाय करणा-या व्यक्तींना ग्रामसेवक व सरपंच, नगरपालिका मुख्याधिकारी, महानगरपालीका आयुक्त/उपायुक्त/प्रभाग अधिकारी यांचे कडुन अस्वच्छ व्यवसाय करित असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  5. अनु.जाती मध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.
  6. विद्यार्थी वसतिगृहात राहणारा असल्यास वसतिगृहाच्या अधिक्षक/गृहपाल यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
  7. सदर योजनेचा लाभ इतर मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्तीचा लाभार्थ्यांना लागु राहणार नाही.

 

अर्ज करण्याची पद्धत

            संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे.

 

 

योजनेचे नांव इ. 9 वी व 10 वीत शिकणा-या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपुर्व                              शिष्यवृत्ती योजना

 

 

 

उद्देश :-

        अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांचे शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्येशाने केंद्र शासनाने दि. 2013-14 पासुन इ. 9वी व 10 वी मध्ये शिकत असणा-या अनु.जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना सुरु केली आहे.

 

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

  1. वसतिगृहात न राहणारे विद्यार्थ्यांना दरमहा रु.150 प्रमाणे 10 महिन्यांकरिता रु. 1500/- व तदर्थ अनुदान रु.750/- असे एकुण रु.2250/-
  2. वसतिगृहात राहणारे विद्यार्थ्यांना दरमहा रु.350 प्रमाणे 10 महिन्यांकरिता रु. 3500/- व तदर्थ अनुदान रु.1000/- असे एकुण रु.4500/- शिष्यवृत्ती दिल्या जाते.

 

योजनेच्या प्रमुख अटी

  1. विद्यार्थी हा अनु.जाती या प्रवर्गातील असावा.
  2. सदर योजना शासकिय मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यांस लागु राहिल.
  3. सदर योजनेंतर्गत शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यांदा रु. 2.00 लक्ष इतकी राहील.
  4. सदर योजनेंतर्गत विद्यार्थ्यांने अर्ज करणे आवश्यक आहे.
  5. सदर योजनेचा लाभ केंद्राच्या इतर मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्तीचा लाभार्थ्यांना लागु राहणार नाही.

 

अर्ज करण्याची पद्धत

            संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे.

 

 

योजनेचे नांव शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने.

 

उद्देश :-

        इ. 10 वी मध्ये शिकणा-या मागासवर्गीय अनुसुचित जाती, अनु.जमाती, विजाभज विमाप्र विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रमाणे परिक्षा शुल्क देण्यात येते.

 

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ प्रमाणे सद्यस्थितीत 2016-17 पासुन रु. 415/- परिक्षा शुल्क देण्यात येते.

योजनेच्या प्रमुख अटि

  1. विद्यार्थी हा अनु.जाती, अनु.जमाती, विजाभज/विमाप्र या प्रवर्गातील असावा.
  2. सदर योजना शासकिय मान्यता प्राप्त शाळेत शिकत असणा-या विद्यार्थ्यांस लागु राहिल.

 

अर्ज करण्याची पद्धत

            संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे.

 

 

योजनेचे नांव इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणा-या इतर मागासप्रवर्गातील (OBC)विद्यार्थ्याना भारत सरकार मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना

 

उद्देश :-

        इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणा-या इतर मागासवर्ग प्रवर्गातील गरीब कुटुंबातील मुलांमुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने भारत सरकारची मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना सन 2019-20 या वर्षापासुन लागु करण्यात आलेली आहे.

 

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

  1. अनिवासी विद्यार्थी-प्रतिमाह 100/- रु असे 10 महिन्याकरिता 1000/- व तदर्थ अनुदान 500/- असे एकुण 1500/- रु. (इ. 1ली ते 10वी)
  2. वसतिगृहात राहणारा विद्यार्थीप्रतिमाह 500/- रु असे 10 महिन्याकरिता 5000/- व तदर्थ अनुदान 500/- असे एकुण 5500/- रु. (इ. 3 री ते 10 वी)

शिष्यवृत्ती दिल्या जाते.

 

योजनेच्या प्रमुख अटी

1. सदर योजना ही फक्त् इतर मागासप्रवर्गातील (OBC) मुलां-मुलींकरीता लागु आहे.

2. विद्यार्थी ही/हा नियमीत शाळेत येणारी/येणारा असावा व तीची शाळेतील उपस्थिती ही 60  

   % च्या वर असणे आवश्यक आहे.

3. सदर विद्यार्थी ही/हा मागीलशैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेली असावी/असावा. 

4. सदर शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्याच्या पालकाची उत्पन्नाची मर्यादा 2.50 लक्ष वार्षिक

   इतकी राहील.

5.या  योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यास अन्य मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता

   येणार नाही.

 

अर्ज करण्याची पद्धत

            संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे.

 

 

योजनेचे नांव इयत्ता 1 ली ते 10 वी मध्ये शिकत असणा-या विमुक्त जाती व भटक्या जमाती (DNT) विद्यार्थ्याना भारत सरकार ची डॉ. आंबेडकर मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना

 

उद्देश :-

        विमुक्त जाती भटक्या जमाती (DNT) प्रवर्गातील गरीब कुटुंबातील मुलामुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्याच्य दृष्टिने इ. 1 ली ते 10 वी मध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांकरिता सन 2019-20 पासुन भारत सरकारची डॉ. आंबेडकर मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजना लागु करण्यात आलेली आहे.

 

दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप

  1. इयत्ता 1 ली ते 8 वीतील विद्यार्थ्यांकरिता-प्रतिमाह 100/- रु असे 10 महिन्याकरिता 1000/-रु
  2. इयत्ता 9 वी व 10 वीतील विद्यार्थ्यांकरिता -  प्रतिमाह 150/- रु असे 10 महिन्याकरिता 1500/- रु.

 

योजनेच्या प्रमुख अटी

  1. सदर योजना ही फक्त् गरीब विमुक्त जाती व भटक्या जमाती DNT DENOTIFIED

NOMADIC AND SEMI NOMADIC TRIBES प्रवर्गातील गरीब कुटुंबातील मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने मुलां-मुलींकरीता लागु केली आहे.

  1. विद्यार्थी ही/हा नियमीत शाळेत येणारी/येणारा असावा व तीची शाळेतील उपस्थिती ही 60% च्या वर असणे आवश्यक आहे.

   3. सदर विद्यार्थी ही/हा मागीलशैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेली असावी/असावा. 

   4. सदर शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्याच्या पालकाची उत्पन्नाची मर्यादा 2.00 लक्ष वार्षिक

      इतकी राहील.

   5. या योजनेचा लाभ घेणा-या विद्यार्थ्यास अन्य मॅट्रिकपुर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता

      येणार नाही.

 

अर्ज करण्याची पद्धत

            संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळेतील पात्र विद्यार्थ्यांचे प्रस्ताव संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावे.

 

 

योजनेचे नाव – राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार

 

योजनेचा उददेश –

व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना प्रोस्ताहन देण्यासाठी अशा व्यक्तींना व संस्थांना सन्मानित करणे.

 

योजनेच्या प्रमुख अटी व शर्थी –

सामाजिक न्याय व विेशेष सहाय विभाग शासन निर्णय 16/08/2012 नुसार व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार मिळवणा-या व्यक्तीसाठी अटी व शर्थी – 1) महाराष्ट्राचा रहिवासी असावा.

2 ) कोणत्याही जाती / धर्माची व प्रवर्गाची अट नाही.

3 ) व्यसनमुक्ती क्षेत्रात 15 वर्ष उल्लेखनिय कार्य केलेले असावे.

4 ) वयाची अट नाही.

5) विहित नमुन्यातील अर्ज.

संस्थांसाठी अटी व शर्थी – 1 ) संस्था नोंदणी 1860 व 1950 नुसार नोंदणीकृत असावी.

2 ) व्यसनमुक्ती क्षेत्रात 10 वर्षाहुन अधिक कार्य केलेले असावे.

3 ) विविध माध्यमातून व्यनसमुक्ती प्रचार व प्रसिदधी जिल्हयात करणे.

5 ) मागील पाच वर्षाचे लेखापरिक्षण अहवाल

6 ) विशेष कार्यक्रमांची छायाचित्रे इत्यादी

7 ) विहित नमुन्यातील अर्ज.

लाभाचे स्वरूप –

व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणा-या व्यक्तींना प्रतिवर्ष सन्मानपत्र, स्मृती चिन्ह व रू 15000 /- तर शासन मान्य संस्थांना सन्मानपत्र, स्मृती चिन्ह व रू 30000 /- पुरस्काराची रक्कम देवून सन्मानित करण्यात येते.

 

अर्ज करण्याची पदधत –

व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणा-या व्यक्तींना राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय जिल्हा परिष्द हिंगोली येथे उपलब्ध असुन सदर अर्ज त्यांचेमार्फत आयुक्त समाज कल्याण, पुणे यांचेकडे पाठविण्यात येतात.

 

योजनेचे नाव –स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणा-या मागासवर्गीय अनुदानित वसतिगृहांना  सहायक अनुदाने.

 

अमलबजावणी करणारी यंत्रणा– जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली

 

योजनेचा उददेश –

जिल्हयातील मागासवर्गीय विदयार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुर्ण करता यावा. ग्रामीण भागामधील शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे.

 

योजनेचे स्वरूप

सदर योजना ही 5 ते 12 वी मध्ये शिकणा-या अनु जाती/जमाती/विजाभज/विमाप्र या प्रवर्गातील मुला-मुलींसाठी असुन हिंगोली जिल्हयामध्ये मागासवर्गीय मुलांसाठी 32 व मुलींसाठी 12 अशी एकुण 44 अनुदानित वसतिगृहे कार्यरत असुन यामध्ये 1286 मुले व 378 मुली अशा एकुण 1664 विदयार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यात येतो.सदर वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सबंधित वसतिगृहाचे अधिक्षक/अधिक्षिका यांचेशी संपर्क साधून प्रवेश घेता येतो.

 

योजनेच्या प्रमुख अटी व शर्थी –

  1. सदर योजना ही 5 ते 12 वी मध्ये शिक्षण घेणा-या मुला-मुलींसाठी आहे.
  2. विदयार्थी हा अनु जाती/जमाती/विजाभज/विमाप्र व दिव्यांग या प्रवर्गातील असावा.
  3. सदर योजनेंतर्गत लाभ घेणारा विदयार्थी हा वसतिगृह ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा स्थानिक रहीवासी नसावा.
  4. सदर वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी सबंधित वसतिगृहाचे अधिक्षक/अधिक्षिका यांचेशी संपर्क साधून प्रवेश घेता येतो.

 

योजनेचे नाव –   समाज कल्याण 20 टक्के मागासर्गीय सेस अंतर्गत ग्रामीण भागातील    मागासवर्गीय  लाभार्थ्यांना अर्थसहाय पुरविणे.

 

प्रस्तावना – सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना अर्थसहाय पुरविण्यात येते.

अमलबजावणी करणारी यंत्रणा– जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली

योजनेचे उदिष्ट्– सदर योजनेंतर्गत ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांना अर्थसहाय पुरवून त्यांचा                                 आर्थिक विकास घडवून आणने.

योजनेचे स्वरूप-  सदर योजना ही ग्रामीण भागातील मागासवर्गीय लाभार्थ्यांर्थ्यांसाठी असुन विविध                                         वैयक्तीक लाभाच्या योजना सदर योजनेअंतर्गत घेण्यात येतात.

 

योजनेच्या अटी व शर्थी –

  1. सदर लाभार्थी हा हिंगोली जिल्हयातील ग्रामीण भागातील रहीवासी असावा.
  2. सदर योजना ही 18 वर्षावरील ग्रामीण भागातील मागासवर्गीय स्त्री व पुरूषांसाठी आहे.
  3. सदर योजनेअंतर्गत लाभार्थी हा अनु जाती/ जमाती/ विजाभज/ विमाप्र या प्रवर्गातील असावा.