ग्रामपंचायत विभाग

जिल्हा ग्राम विकास निधी कर्ज

प्रस्तावना

      महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 133 नुसार प्रत्येक  जिल्हा  परिषदेमध्ये जिल्हा ग्राम विकास निधी गठीत केलेला आहे .मुंबई जिल्हा ग्रामविकास निधी नियम 1960 नुसार प्रत्येक ग्रामपंचायतीनेतिच्या मागील वित्तीय वर्षातील उत्पन्नाचे 0.25 % रक्कम अंशदान म्हणून जिल्हा ग्रामविकास निधी डिसेंबर पुर्वी जमा करण्याच तरतुद आहे.ग्राम पंचायतीकडून अंशदान म्हणून प्राप्त झालेल्या निधीतून पंचायतीना अधिनियमातील अनुसूची एक मध्ये निर्दिष्ट केलेलीविकास  कामे पार पाडण्यासाठी  ग्राम  पंचायतीची किमान  अर्थिक ‍स्थीती व  कर्ज  परत  फेडीची  क्षमता विचारात घेवून  अंदाजपत्रकीय रकमेच्या 75 % प्रमाणे  कर्ज मंजूर करता येते. ग्राम पंचायती कडून प्राप्त झालेल्या कर्ज प्रकरणाची छाननी केल्यानंतर कर्ज मंजूरी अधीकार स्थायी  समीतीस आहेत.