समाज कल्याण विभाग

आस्थापना

आस्थापना

समाज कल्याण विभागाची निर्मिती शिक्षण व समाज कल्याण विभागाची विभागणी होउन माहे मार्च 1972 मध्ये झाली. सामान्य प्रशासन विभाग अधिसुचना क्रमांक आरओबी-1083.43.18;ओ एन्ड एमध्द दिनांक 22 एप्रिल 1943 नुसार समाज कल्याण,सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाची दिनांक 1 मे 1983 पासुन विभागणी करण्यात आली असून आदिवासी विभागा संबंधीचे विषय नवनिर्मित आदिवासी विकास विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले व या विभागाचे नांव समाज कल्याण,सांस्कृतीक कार्य व क्रीडा व पर्यटन विभाग असे होते तदनंतर शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्र.आरवोबी-1093.280 सिआर-18.93.18 रवका दिनांक 27 एप्रिल 1993 अन्वये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आला. शासन अधिसुचना सामान्य प्रशासन विभाग क्रमांक आर वोवी/1093/सीआर-66.93.18 रवका दिनांक 24 जुन 1993 अन्वये महिला व बाल कल्याण विभाग या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र शासनाने समाज कल्याण्ा विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, व ईतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग कल्याण या स्वतंत्र विभागाची दि.10 मार्च 1999 पासुन स्थापना केली.